सावंतवाडी : दिलेला शब्द पाळणारा कार्यकर्ता म्हणून संजू परब यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. प्रामाणिकपणे काम केल्यास राजकीय जीवनात तुम्हाला हमखास यश मिळेल, अशा शुभेच्छा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी संजू परब यांना वाढदिवसानिमित्ताने दिल्या. सावंतवाडी मतदार संघात अनेक समस्या आहेत. आपण आमदारकीसाठी न लढूता या ठिकाणी असलेल्या हातांना काम मिळण्यासाठी प्रयत्न करुया, नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करूया, त्यासाठी तुमचे सहकार्य महत्वाचे आहे, असे आवाहन राजन तेली यांनी आज येथे केले.

माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा वाढदिवस आज त्यांच्या कार्यालयाकडे साजरा करण्यात आला. यावेळी श्री. तेली बोलत होते. यावेळी त्यांनी श्री. परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. परब यांना शुभेच्छा देताना अनेकांनी भावी आमदार म्हणून त्यांचा उल्लेख केला. हाच धागा पकडून श्री. तेली म्हणाले, या ठिकाणी पक्ष संघटना वाढविण्यासाठी आम्ही काम करुया, कोण आमदारकीचा उमेदवार असेल याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. त्यामुळे आमदारकीसाठी भांडण्यापेक्षा त्या ठिकाणी लोकांना रोजगार कसा मिळेल यासाठी आमचे प्रयत्न करुया.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी म्हणाले, जे अनेक वर्षात सावंतवाडीत कोणाला जमले नाही ते संजू परब यांनी केले. सावंतवाडी पालिकेची सत्ता भाजपाच्या ताब्यात दिली. आगामी काळात सुध्दा त्यांना निश्चितच यश मिळेल. त्यांच्या इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण होवोत, अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, युवा नेते विशाल परब, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवींद्र मडगावकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, राजू बेग, दीपक नारकर, जावेद खतीब, प्रमोद कामत, मोहिनी मडगावकर, बंटी पुरोहित, संदेश टेमकर, चंद्रकांत जाधव, पुखराज राजपुरोहित, सुनिल राऊळ, प्रितेश राऊळ, अॅड. अनिल निरवडेकर, शेखर गावकर, शर्वाणी गांवकर, प्रमोद गावडे, हेमंत मराठे, दादा साईल, मकरंद तोरसकर, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, विनोद सावंत, हेमंत बांदेकर, सत्या बांदेकर, अमित परब, हनुमंत पेडणेकर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आदि उपस्थित होते.





