आगामी काळ संजू परबांचाच ..! – निलेश राणे ; संजू परबांवर वाढदिनी झाला शुभेच्छांचा वर्षाव !

41

सावंतवाडी : संजू परब हा जनसामान्यांच्या मनातला माणूस आहे. येणारा काळ त्यांचाच आहे, असे कौतुक भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांनी केले आहे. सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी सावंतवाडीच्या आमदारकीसाठी संजू परब यांना संधी मिळावी, अशा शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी दिल्या.

शनिवारी संजू परब यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा करण्यात आला. त्यांच्या कार्यालयासमोर अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहत मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संजू परब हा आमच्या कुटुंबातील सदस्य आहे. त्यामुळे त्याचा वाढदिवस हा आमचा कौटुंबिक सोहळा आहे. त्याचा वाढदिवस मी कधीही चुकवत नाही. गेल्या अनेक वर्षांचं असलेलं आमचं हे नातं आम्ही दोन्ही बाजूने टिकवलं आहे. अनेक उन्हाळे पावसाळे आले मात्र माणूस म्हणून संजू कधीही बदलला नाही. पद येतात जातात पण जोडलेली नाती व संबंध कायम राहतात. संजूचा हाच गुण वाखाणण्याजोगा असून त्याला नाती जपता येतात. राजकारणात ज्याला नाती व संबंध जपता येतात तोच राजकारणात यशस्वी होतो. मात्र, ज्याला लोकांची मन कळली तो लोकांच्या ‘मनातील ‘नेता’ होतो. पक्षात काम करत रहा, पक्षाला मोठ करा, पक्ष तुम्हाला मोठा करेल, असे मत निलेश राणे यांनी व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापून संजू परब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दरवर्षी वाढदिनी कार्यकर्त्यांच प्रेम मिळत. गेली १४ वर्ष निलेश राणे वाढदिनी प्रत्यक्ष शुभेच्छा देतात. हे प्रेम असच राहुदेत. आपलं प्रेम जोमानं काम करायची उर्जा देत असं मत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त करत आभार मानले.

निलेश राणेंमुळे माझ्या जीवनाला उभारी मिळाली असं प्रतिपादन करत तुमचा ऋणातच राहीन असे ऋण संजू परब यांनी व्यक्त केले. याप्रसंगी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, युवा नेते विशाल परब, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवींद्र मडगावकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, राजू बेग, दीपक नारकर, जावेद खतीब, प्रमोद कामत, मोहिनी मडगावकर, बंटी पुरोहित, संदेश टेमकर, चंद्रकांत जाधव, पुखराज राजपुरोहित, सुनिल राऊळ, प्रितेश राऊळ, अँड. अनिल निरवडेकर, शेखर गावकर, शर्वाणी गांवकर, प्रमोद गावडे, हेमंत मराठे, दादा साईल, मकरंद तोरसकर, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, विनोद सावंत, हेमंत बांदेकर, सत्या बांदेकर, अमित परब, हनुमंत पेडणेकर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आदि उपस्थित होते.