सावंतवाडी : एक आदर्श आणि संयमी कार्यकर्ता कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे संजू परब आहेत. प्रत्येकाच्या मनात त्यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. एक यशस्वी उद्योजक, राजकारणी यांसह एक जिंदादिल माणूस म्हणून त्यांची ओळख आहे, असे मत भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी येथे व्यक्त केले. माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी सावंतवाडीच्या आमदारकीसाठी संजू परब यांना संधी मिळावी, अशा शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी दिल्या.

दरम्यान अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापून संजू परब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दरवर्षी वाढदिनी कार्यकर्त्यांच प्रेम मिळत. गेली १४ वर्ष निलेश राणे वाढदिनी प्रत्यक्ष शुभेच्छा देतात. हे प्रेम असच राहुदेत. आपलं प्रेम जोमानं काम करायची उर्जा देत असं मत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त करत आभार मानले. निलेश राणेंमुळे माझ्या जीवनाला उभारी मिळाली असं प्रतिपादन करत तुमचा ऋणातच राहीन, असे ऋण संजू परब यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, युवा नेते विशाल परब, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवींद्र मडगावकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, राजू बेग, दीपक नारकर, जावेद खतीब, प्रमोद कामत, मोहिनी मडगावकर, बंटी पुरोहित, संदेश टेमकर, चंद्रकांत जाधव, पुखराज राजपुरोहित, सुनिल राऊळ, प्रितेश राऊळ, अँड. अनिल निरवडेकर, शेखर गावकर, शर्वाणी गांवकर, प्रमोद गावडे, हेमंत मराठे, दादा साईल, मकरंद तोरसकर, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, विनोद सावंत, हेमंत बांदेकर, सत्या बांदेकर, अमित परब, हनुमंत पेडणेकर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आदि उपस्थित होते.





