सावंतवाडी : मला दरवर्षी वाढदिनी कार्यकर्त्यांच प्रेम मिळतं. मात्र गेली तब्बल १४ वर्षे निलेश राणे साहेब माझ्या वाढदिनी प्रत्यक्ष येवून मला शुभेच्छा देतात. हे प्रेम असेच राहुदेत. आपले प्रेम जोमानं काम करायची सकारात्मक ऊर्जा देत असतं , असे मत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार मानले. निलेश राणेंमुळे माझ्या जीवनाला उभारी मिळाली, असेही त्यांनी प्रतिपादन करत तुमच्या ऋणातच मी राहीन असे ऋण संजू परब यांनी व्यक्त केले.

सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. याप्रसंगी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, युवा नेते विशाल परब, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवींद्र मडगावकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, राजू बेग, दीपक नारकर, जावेद खतीब, प्रमोद कामत, मोहिनी मडगावकर, बंटी पुरोहित, संदेश टेमकर, चंद्रकांत जाधव, पुखराज राजपुरोहित, सुनिल राऊळ, प्रितेश राऊळ, अँड. अनिल निरवडेकर, शेखर गावकर, शर्वाणी गांवकर, प्रमोद गावडे, हेमंत मराठे, दादा साईल, मकरंद तोरसकर, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, विनोद सावंत, हेमंत बांदेकर, सत्या बांदेकर, अमित परब, हनुमंत पेडणेकर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आदि उपस्थित होते.






