देवगड : आज दिनांक 17/08/2023 रोजी बापर्डे गावचे सुपूत्र श्री. सुहास राणे यांचे पुतणे व लंडन येथे वास्तव्यास असणारे श्री. रवींद्र केशवराव राणे, पत्नी सौ. कविता रवींद्र राणे व मुलगी कुमारी जुई रवींद्र राणे यांनी ग्रामपंचायत बापर्डेला भेट दिली. बापर्डे गावा विषयी दूरचित्रवाहिनीवरती व वर्तमानपत्रामध्ये येत असलेल्या बातम्या पाहून रवींद्र राणे आणि परिवार प्रत्यक्ष गावाला भेट देण्यासाठी आले. लंडन येथे नोकरी व्यवसायानिमित्त असतानासुद्धा त्यांची आपल्या गावाबद्दल व गावाच्या विकासाबाबत आत्मीयता असून गावामध्ये शैक्षणिक कार्यामध्येसुद्धा त्यांचे मोठे योगदान आहे. ग्रामपंचायतमध्ये येवून त्यांनी गावामध्ये झालेल्या विकासकामांबाबत व ग्रामपंचायती राबविण्यात येणारे विविध उपक्रम तसेच ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
श्री. रवींद्र राणे आणि त्यांचे कुटुंबीय गावामधील स्वच्छता पाहून भारावून गेले व त्यांनी ग्रामपंचायत सफाई कर्मचारी श्री.उमेश सावळाराम सकपाळ यांना रोख रु.10,000/- पारितोषिक देवून गौरव केला. यावेळी सरपंच श्री. संजय लाड, ग्रामसेवक श्री.सुशील जाधव, ग्रा.प. सदस्य गुणवंत राणे, माजी सरपंच श्री. जयराम राणे, ग्रामस्थ श्री. बाबुराव राणे व ग्रामपंचायत कर्मचारीवर्ग उपस्थित होते. श्री.रवींद्र राणे यांनी सर्वांचे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.





