तंत्रज्ञानाबरोबर संस्कार, संस्कृती व शिक्षण ही त्रिसूत्री जपा! ; आबा पुजारे यांचे प्रतिपादन .

36

मुणगे : विज्ञानाची कास धरून आपण विकास करतो आहोत हे जरी महत्त्वाचे असले तरी विज्ञानाबरोबरच संस्कार व संस्कृती जिवंत ठेवली पाहिजे. म्हणजेच तंत्रज्ञानाबरोबर संस्कार संस्कृती व शिक्षण हि त्रिसूत्री जपली पाहिजे. तरचं आपण यशस्वी होऊ शकतो, असे मत भगवती एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक देवदत्त ऊर्फ आबा पुजारे यांनी व्यक्त केले. ते येथील देवी भगवती देवस्थान समितीच्या वतीने आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते.

देवी भगवती देवस्थान मुणगे यांच्या वतीने गावातील सर्व प्राथमिक शाळा, हायस्कूल व ज्युनिअर काँलेज मधुन प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ देवस्थान समितीचे अध्यक्ष ओंकार पाध्ये यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मुणगे सरपंच सौ साक्षी गुरव, देवस्थान समितीचे उपाध्यक्ष दिलीप महाजन, सचिव निषाद परूळेकर, भगवती एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक देवदत्त ऊर्फ आबा पुजारे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद सावंत, देवस्थान समिती विश्वस्थ प्रकाश सावंत, प्राथमिक शाळा लब्देवाडी चे मुख्याध्यापक गजानन राणे भगवती हायस्कूल शिक्षक प्रतिनिधी सौ गौरी तवटे, विश्वस्थ पुरुषोत्तम तेली, रामचंद्र मुणगेकर, आनंद घाडी, अनिल धुवाळी, लेखनीक रामतीर्थ कारेकर, पत्रकार झुझांर पेडणेकर,

विश्वास मुणगेकर, दिगंबर पेडणेकर, सुरेश बोरकर, पोलीस पाटील सौ. साक्षी सावंत. आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन देवस्थानच्यावती देवदत्त पूजारे यानी स्वागत केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते गावातील सर्व प्राथमिक शाळा मधील इयत्ता पहिली ते चौथी व हायस्कूल आणि ज्युनिअर काँलेज मधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी यांचा रोख रक्कम व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना श्री पुजारे पुढे म्हणाले कि. देवी भगवती भगवती मंदिरामध्ये पारितोषिक मिळत आहे हा योगायोग आहे, आपण सदोदित लक्षात ठेवले पाहिजे कि पारितोषिक मिळाले कि ते घ्यायचे व खर्च करायचे. असे नसते भगवती देवीच्या कृपा छत्राखाली मिळालेल्या पारितोषिकाला फार महत्त्व आहे. त्यामध्ये पैसे किती आहेत हे महत्त्वाचे नाही तर ते पारितोषिक देण्यामागची भावना हि शाब्बासकीची थाप म्हणून पारितोषिक दिले जाते. हे पारितोषिक स्विकारल्यानंतर तुमच्या मध्ये ईर्शा निर्माण झाली पाहिजे कि आज जे पहिल्या दुसऱ्या तीसऱ्या क्रमांकांची पारितोषिक घेत आहेत त्यामध्ये पुढच्या वर्षी माझा पहिला नंबर आला पाहिजे. एखाद्या हाँलमध्ये हा पारितोषिक वितरण कार्यक्रम असतो त्यावेळी पारितोषिक स्विकारतो त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात व फक्त टाळ्या वाजवण्यात धन्यता मानतात. परंतु त्यांच्या मध्ये ईर्षा निर्माण झाली पाहिजे कि आपण ज्यांच्यासाठी टाळ्या वाजवतो त्याना आपल्या साठी टाळ्या वाजवाव्य लागतील. विज्ञान व तंत्रज्ञान विकसित करित असताना विज्ञानाची कास धरून आपण विकास करतो. हे महत्त्वाचे असले तरी विज्ञाना बरोबर संस्कार व संस्कृती जिवंत ठेवल्या पाहिजे . काहि दिवसापुर्वीच भारतीय शास्त्रज्ञांनी चाद्रयान सोडले ते सुध्दा मोठ मोठे शास्त्रज्ञ होते. त्यांनी सुध्दा संस्कार व संस्कृती जपली चांद्रयान सोडण्यापूर्वी त्यानी श्री सिध्दिविनायकांचे दर्शन घेतले होते. तीच भावना जपा अभ्यासा मध्ये प्रगती करून आपल्या आईवडील व गावाचे नाव उज्वल करा.
देवी भगवती सर्वाच्या पाठिशी असल्याचे शेवटी श्री पुजारे यानी सांगितले, यावेळी सरपंच सौ साक्षी गुरव यानी आपल्या मनोगतातून पारितोषिके मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तर भगवती हायस्कूल च्या सहाय्यक शिक्षिका सौ गौरी तवटे यानी आपल्या हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन देवस्थानच्या वतीने गौरव केला त्याबद्दल देवस्थानचे आभार मानले व असेच उपक्रम राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी गजानन राणे यानी देवस्थानच्या या उपक्रमाबाबत देवस्थान चे कौतुक करुन आभार मानले यावेळी मुणगे शाळा नं. १ चे मुख्याध्यापक विशाल खडसे, मुणगे नं २ चे मुख्याध्यापक नंदकुमार सोनटक्के, आपवाडी शाळेचे मुख्याध्यापक गणेश खरात, सडेवाडी शाळेचे मुख्याध्यापक संतोष राठोड, संतोष लब्दे, सुरबा सावंत, गणपत दळवी, संजय पुजारे, श्री पाडावे, कृष्णकांत गुरव, प्रभाकर घाडी आप्पा घाडी, दत्ताराम आईर, धाकोजी सावंत, अशोक रुपे, रमेश परब, बाळकृष्ण बागवे, शंकर नाटेकर, मोहन परब, सौ महाजन, सौ अनुजा कारेकर व विद्यार्थी पालक, महिला वर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थित मान्यवरांचे आभार देवदत्त पुजारे यांनी मानले.