BIG BREAKING – संजय राऊतांच्या निकटवर्तीयाला अटक ; मुंबई कोविड सेंटर घोटाळा प्रकरण.

27

मुंबई : मुंबईचे कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी सुजित पाटकर यांना अटक केली आहे. सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. मुंबई कोविड सेंटर प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 36 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबईच्या आझाद मैदान पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.ईडीने यापूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पाटकर यांना अटक केली होती.