रत्नागिरी : जनसंवाद कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये उपविभाग व तालुकास्तरावर १४ ठिकाणी महसूल अदालत घेण्यात आली. या महसूल अदालतमध्ये ४० प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २८ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. तसेच सलोखा योजना अंतर्गत जिल्ह्यामध्ये तालुका व मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरांमध्ये ६ प्रकरणे प्राप्त झाली होती. यामधील १ प्रकरणांमध्ये
सलोखा योजना अंतर्गत लाभ देण्यात आला.
तसेच गावागावातील / शेतातील रस्त्यांबाबत प्रलंबित प्रकरणे या योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये तालुका व मंडळ स्तरावर ६३ ठिकाणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरांमध्ये ६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. महिला सक्षमीकरण (लक्ष्मी योजना) अंतर्गत जिल्ह्यामध्ये एकूण २० लाख ८७ हजार ९१६ इतके सातबारे असून त्यापैकी सहहिस्सेदार म्हणून महिलांच्या नोंदी करण्यासाठी ५५ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ४४ सातबारांवर महिलांच्या नोंदी घेण्यात आल्या. या शिबिरांमध्ये १७९ सातबारा उताऱ्यांचे वाटप करण्यात आले.





