सावंतवाडी : येथील मोती तलावात असलेल्या प्लास्टिकचा कचरा अखेर सावंतवाडी पालिकेकडून काढण्यात आला. आज ही मोहीम राबविण्यात आली.
परंतु कचरा टाकताना कोणी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच तलाव परिसरात असलेल्या हॉटेल व्यावसायिकांना नोटीसा बजावण्यात येणार आहेत, असे पालिकेच्या आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, याबाबतची मागणी सावंतवाडी भाजपाचे युवा नेते बंटी पुरोहित यांनी केली होती. त्यानंतर ही मोहीम राबविण्यात आली.
पालिकेने आपण केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्यामुळे श्री. पुरोहित यांनी पालिका प्रशासनाचे आभार मानले आहे. तर कचरा होवू नये यासाठी पालिका प्रशासनाने मोहिमेत सातत्य ठेवावे, असेही त्यांनी आवाहन केले आहे.





