आनंदव्हाळ, कातवड गावांमध्ये कृषीकन्यांचे आगमन‌ ; केली शेतीविषयक जनजागृती..!

21

मालवण : उद्यान विद्या महाविद्यालय, मुळदे येथील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२३ अंतर्गत आनंदव्हाळ कातवड गावामध्ये कृषीकन्यांचे आगमन झाले आहे. विद्यार्थिनी ऑगस्ट ते डिसेंबर या पाच महिने कालावधीत गावामध्ये राहून शेती विषयक माहिती घेणार आहेत. गावात राहून गावाची शेती विषयक कार्यपद्धती, विविध संस्था, शाळा, शेतीवर आधारित विविध उद्योग यांची सविस्तर माहिती घेतली जाणार आहे. विविध शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेती विषयक ज्ञानाची देवाणघेवाण होणार आहे. आनंदव्हाळ गावच्या सरपंच सौ. रश्मी टेंबुलकर, उपसरपंच दिपक गोवेकर, ग्रामसेविका सौ. मनीषा गोसावी तसेच कातवड गावाच्या सरपंच सौ. प्रणिता हळदणकर, उपसरपंच गणेश चव्हाण, ग्रामसेविका सौ. युती चव्हाण तसेच सदस्य व इतर ग्रामस्थ यांच्याकडून मोलाचे सहकार्य लाभणार आहे.
उद्यान विद्या महाविद्यालय मुळदे येथील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२३ अंतर्गत सदर गटामध्ये कुमारी रुचिता राणे, कु. हर्षला होबळे, कु. अमृता कनारा, कु. प्रज्ञा घाडी, कु. मंदाकिनी शिंदे या विद्यार्थिनींचा समावेश आहे.