अवतरली सुंदरा…! कंगनाच्या ‘चंद्रमुखी 2’ चा फर्स्ट लूक रिलिज..!

45

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही पंगा क्विन म्हणुन ओळखली जाते. ती तिच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. ती तिच्याचंद्रमुखी 2′ मधील कंगणाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. कंगनाला या लूकमध्ये पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. यासोबत तित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही निर्मात्यांनी शेयर केली आहे. हा चित्रपट सप्टेंबर महिन्यात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. तो साऊथच्या ब्लॉकबस्टर सिनेमाचा सिक्वेल आहे. अभिनयानाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. सध्या कंगना तिच्या चंद्रमुखी – 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘चंद्रमुखी 2’ चा पहिला लूक शेअर करत कॅप्शन लिहिले आहे, ‘सौंदर्य आणि पोझ. चंद्रमुखी २ मधील कंगना राणौतचा फर्स्ट लूक. ‘

कंगनाचा हा लूक प्रेक्षकांना खुप आवडला आहे. कंगनाचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये रिलिज होणार आहे.

‘चंद्रमुखी 2’ सिनेमा बद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा 2005 साली आलेल्या चंद्रमुखीच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सिक्वेल आहे.

चंद्रमुखीच्या पहिल्या भागात रजनीकांत डॉ. सरवणन आणि वेट्टय्यान राजा यांच्या भूमिकेत होते. तर ज्योतिका ही ‘चंद्रमुखी’च्या भुमिकेत होती. चंद्रमुखी – 2 वेट्टय्यान राजा आणि कंगना चंद्रमुखीच्या भूमिकेत या चित्रपटातुन प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. कंगना रणौतच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच तिच्या ‘इमर्जन्सी’ आणि ‘तेजस’ चित्रपटात दिसणार आहे.