उद्या खानोलीत होणारा ‘वामन अवतार’ दशावतार नाट्यप्रयोग रद्द..!

53

वेंगुर्ला : उद्या दिनांक २१ जुलै २०२३ रोजी खानोली रवळनाथ मंदिर येथे होणारा संघर्षमय महान पौराणिक नाविन्यपूर्ण नाट्यप्रयोग ‘वामन अवतार’ हा संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टी आणि वादळी वारे वाहण्याचा इशाऱ्यामुळे रद्द करण्यात आला असल्याचे आयोजक खानोली ग्रामस्थ तसेच मित्रपरिवार यांनी कळविले आहे.

या नाट्यप्रयोगाची पुढील तारीख व वेळ आम्ही नाट्यरसिकांना लवकरच कळवू असेही आयोजक खानोली ग्रामस्थ आणि मित्रमंडळी यांनी कळविले आहे.