पाळणेकोंड धरण ओव्हरफ्लो | बबन साळगावकर यांची माहिती..!

76

सावंतवाडी :शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेकोंड हे धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले आहे. याबाबतची अधिक माहिती माजी नगराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते बबन साळगावकर यांनी ‘महाराष्ट्र माझा’ला दिली.

गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे कुणकेरी-पाळणेकोंड धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. या धरणाला बसविण्यात आलेल्या गोडबोले गेटचे सहाही हायड्रोलिक दरवाजे उघडले आहेत. धरण पूर्ण भरल्याने सावंतवाडीचा पाणी प्रश्न आता सुटणार आहे.

दरम्यान पाळणेकोंड हे धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत असल्याने सावंतवाडी शहरासह आजूबाजूच्या गावांसाठी ही आनंदाची वार्ता असल्याचे देखील साळगावकर म्हणाले.