दोडामार्ग : तिलारी आंतर राज्य प्रकलापाच्या डाव्या व उजव्या कालव्याचेपाणी गोवा राज्यातील विवीध भागात शेती, व औद्योगिक विकास प्रकल्पांना पाणी पुरवठा करण्यासाठी योजना राबविल्या जात असून यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे तिलारी प्रकल्पासाठी घरदार, जमीन जुमला, शेतीबागायती यांचा त्याग करून दहा गावाचे पुनर्वसन शासनाने केले आहे त्याच्या मुलभूत प्रलंबित प्रश्नाकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही या प्रकरणी आपण जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे लक्ष वेधून लवकरच पुनवर्सन गावठाण सरपंच ,प्रतिनीधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दोडामार्ग येथे दिली.
दोडामार्ग तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत होती येथील तिलारी प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या त्याच्या मागण्या व अडचणी याबाबत त्यांनी शिवसेना तालुका कार्यालयात दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली यावेळी हत्ती कडून होणारी वारंवार नुकसानी दिवसेंदिवस वाढतच आहे याची नुकसान भरपाईची मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहे माञ वाढत्या वन्य प्राण्यांच्या प्रादुर्भावामुळे भविष्यात याबाबतीत ठोस कार्यवाही झाली पाहिजे यासाठी शेतकरी वर्गातून कायम स्वरुपी निर्णय घेण्याबाबत आपण पुढाकार घेत आहोत त्यासाठी या भागांतील शेतकरी प्रकल्पग्रस्त , माजी सैनिक याचेशी संपर्क साधून मते जाणून घेण्याचा प्रयत्न आहे याबाबत वरिष्ठ अधिकारी, मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधून कार्यवाही सुरू केली आहे. यासाठी तळकट परिसरातील शेतकरी वर्गाची मोठी हानी वन्य प्राण्यांच्या प्रादुर्भावामुळे होत आहे सुपारी केळी नारळ बागायती पिके धोक्यात आली आहे आता हत्ती कळपाने धुडगूस घालत बागायती उद्धवस्त केली आहे याकडे वन विभाग यांचे लक्ष वेधण्यात येईल
तिलारी कालव्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी कोट्यवधी निधी मग पुनवर्सन क्षेत्रातील सुविधांसाठी का नाहीं?
तिलारी प्रकल्पग्रस्ताचे प्रलंबित प्रश्नाकडे आपण यापूर्वी गांभीर्याने लक्ष वेधून अनेक निर्णय घेण्याबाबत शासनास भाग पाडले अनेक मंत्री महोदय तिलारी प्रकल्पाच्या ठिकाणी आणून निर्णय घेतले . तिलारीतील शेतकरी वर्गातून शेत जमीन मिळावी या मागण्या संदर्भात तत्कालीन पालकमंत्री, जलसंपदा मंत्री, मदत व पूनर्वसनमंत्री यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला की जमिनी ऐवजी रोख रक्कम एकरी रूपये ६८,९०० देण्यात आले नव्याने गावठाणात ग्रामपंचायती व महसुली गाव घोषित करून अमलबजावणीसाठी प्रयत्न केले आता पर्यंत पुरवण्यात येणाऱ्या नागरी सुविधा अद्यापही अपुऱ्या आहे काही ठिकाणी ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत येणाऱ्या अडचणी सोडविल्या जाव्यात यामध्ये पाल पुनर्वसन गावठाण कुडासे खुर्द, पाटये पुनर्वसन सरगवे आयनोडे आदी गावातील ग्रामस्थ भेटले त्यांनी अनेक समस्या मांडल्या अनेक जणांनी भुखड अदलाबदल झाले आहे हद्द निश्चित नाही जोड रस्ते संपादन केले नाही बुडित क्षेत्रातील जमिनीत जाण्यासाठी रिग रोड व्हावा तसेच त्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याबाबत शासनास भाग पाडणार आहोत याबाबतीत जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता यांचे सोबत चर्चा केली आहे व अन्य समस्या बाबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे लक्ष वेधून सरपंच व ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी माजी उपसभापती रांजेद्र निंबाळकर,, कुडासे विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, युवा सेना प्रमुख भगवान गवस, श्री सावंत आदींनी त्यांचे कार्यालयात स्वागत केले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
पाटये गावचे पुनवर्सन सासोली या ठिकाणी नव्याने गावठाण क्षेत्रातील अनेक प्रश्न भेडसावत आहे यामध्ये देण्यात आले आहे ते अदलाबदल झाले असून ते बदलून मिळावेत मायनर कालव्याची कामे पूर्ण करावी बुडित क्षेत्रातील जमिनीत जाण्यासाठी रिगरोड व्हावा आदी मागण्या करण्यात आल्या यावेळी सरपंच प्रवीण गवस, उपसरपंच, सदस्य ग्रामस्थ यांनी सविस्तर चर्चा केली त्यांना आपले निवेदन सादर करून जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधण्यात येईल असे आश्वासन ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिले.
पाल पुनर्वसन कुडासे खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत भेडसावणारे प्रश्न सोडविण्यात यावे जोड रस्ते स्मशानभूमी रस्ता भूसंपादन प्रक्रिया तात्काळ व्हावी तसेच अन्य प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी कुडासे खुर्द सरपंच संगीता देसाई यांनी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या कडे केली यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे बैठक आयोजित करून समस्या मांडल्या जाव्यात यासाठी ग्रामस्थांची निवेदने स्वीकारून प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही केले
यावेळी त्यांनी पुनर्वसन गावठाण पाहणी केली व ग्रामस्थ माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या प्रश्नांबाबत चर्चा केली आहे





