रामेश्वर प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट स्पर्धा ८ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत…!

 देवगड : श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव व मिठबाव बाजारपेठ मित्रमंडळ यांच्या वतीने ८ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत डे नाईट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धां २०२३ चे आयोजन मिठबाव ग्रीन पार्क स्टेडियम येथे करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक २,२२,२२२ व चषक, द्वितीय क्रमांक १,११,१११ व चषक, तृतीय क्रमांक २५,००० व चषक, चतुर्थ क्रमांक २५००० व चषक आदी बक्षीसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या २४ संघांना प्राधान्य दिले जाईल. क्रीडा प्रेमींनी या स्पर्धेत उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवावी असे आवाहन रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव उर्फ भाई नरे यांनी केले आहे.