सावंतवाडी : माडखोल येथे दुचाकी – इनोव्हा यांच्यात झालेल्या अपघातात सावंतवाडी येथील दोन युवक गंभीर जखमी झाले असून नागरिकांनी त्यांना तात्काळ सावंतवाडी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात आज सकाळी घडला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की सकाळी हे दोन तरूण माडखोल येथून आपल्या दुचाकीने सावंतवाडीच्या दिशेने येत असताना समोरून येणाऱ्या इनोव्हा कारला जोरदार धडक दिली यात हे तरुण गंभीर जखमी झाले. चिन्मय चितारी (वय 16) व सर्वेश गावडे (वय 16) असे या तरुण जखमींची नावे आहेत. दरम्यान या अपघाताबाबत सावंतवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.




