बांद्यात पार पडले भव्य रक्तदान शिबीर…!

बांदा : रविवारी दि. १५ जानेवारी २०२३ रोजी रोटरॅक्ट क्लब आॅफ रायजिंग युथ बांदा, रोटरी क्लब आॅफ बांदा, डाॅ. संदिप फाऊंडेशन बांदा आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा-सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि GMC रक्तपेढीच्या सहकार्याने जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं. १ येथे सकाळी ९:३० ते दुपारी ०१:३० या वेळेत भव्य रक्तदान शिबिर पार पडले.

यावेळी व्यासपीठावर गोवा बांबोळी रक्तपेढीचे डॉ. संजय कोरगावकर, संदीप कल्याणकर फाऊंडेशनचे मनोज  कल्याणकर, बांदा उपसरपंच जावेद खतिब, शशिकांत पित्रे, सिंधुमित्र प्रतिष्ठान दीपक तारी, जि.प.सदस्या श्वेता कोरगावकर, रोटरॅक्टचे अक्षय मयेकर आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ.संजय कोरगावकर यांनी यावर्षी सिंधुदुर्गात रक्तदान शिबिराचे ४० कॅम्प घेण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. सर्वच मान्यवरांनी रक्तदानाचे महत्व सांगून रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. तर सिंधु रक्तमित्र प्रतीष्ठान चे सचिव बबली गवंडे यांनी उद्दिष्टापेक्षा सिंधुदुर्गात जास्त कॅम्प घेऊ असे सांगून कुठलाही रुग्ण रक्ताअभावी दगावणार नाही याचीही काळजी या प्रतिष्ठान कडून घेण्यात  येणार असल्याचे सांगितले. या शिबिरासाठी रोटरी क्लब चे मंदार कल्याणकर सह पदाधिकारी तसेच भाऊ वळंजू, सुधीर शिरसाट, संजय पिळणकर, निलेश मोरोजकर, सह सर्वच प्रतिष्ठान  चे पदादिकारी उपस्थित होते .

या शिबिराला – ७७  रक्तदात्यांनी  रक्तदान केले