विनायक राउतांचा 160 टॉवर मंजुरीचा दावा..!
सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतेच जिल्ह्यात आवश्यक असलेले दूरसंचारसाठी 103 टॉवर मंजूर करून आणल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते . यानंतर येथील खासदार विनायक राऊत यांनी देखील 160 नवीन टॉवर आपल्या प्रयत्नामुळे मंजूर झाल्याचा दावा केला आहे . पहिल्या टप्प्यातील 104 पैकी बहुतेक टॉवरची उभारणी झाली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले . जिल्ह्यात सर्वत्र टॉवर मंजूर झाले तरी जिल्ह्यातील दूरसंचार यंत्रणा देखभालसाठी एकेकाळी 600 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत होते . परंतु सध्या मात्र ही संख्या केवळ 45 वर येऊन ठेपली आहे . त्यामुळे अनेकदा दूरसंचार सेवा विस्कळीत होत आहे . ही कर्मचारी संख्या वाढवून दूरसंचार सेवा अखंडित ठेवणे यावर देखील लोकप्रतिनिधींनी विचार करणे गरजेचे आहे .





