वक्फ कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा | जनजागृती समितीची मागणी

बांदा : हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज बांद्यात फेरी काढून वक्फ कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा, तसेच आतापर्यंत या कायद्याचा वापर करून जी भूमी वक्फ बोर्डाने स्वतःची म्हणून घोषित केली आहे ती मालकाला परत करावी. धार्मिक पक्षपात करणारा, देशाच्या सुरक्षेतेला बाधक ठरणारा, नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेणारा हा कायदा करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशा विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.