बांदा : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना सैनिक मार्गदर्शन भव्य मेळाव्याचे आयोजन दि.18 जानेवारी रोजी पारिजात हॉल कोंडुरा तिठा येथे दुपारी 1 वाजता करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सरचिटणीस संदीप दळवी व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना सरचिटणीस गजानन राणे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सावंतवाडी मतदारसंघातील सर्व सैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सावंतवाडी माजी अध्यक्ष महेश परब यांनी केले आहे.




