कणकवली : कोंबड्या कंपाऊंडमध्ये आल्याच्या रागातून चुलत दिराने वहिनीला दांड्याने मारहाण केल्याची घटना आयनल मणेरवाडी येथे बुधवारी दुपारी घडली. शंकर दत्तात्रय फाटक (रा. आयनल मणेरवाडी) यांनी वहिनी योगिता यशवंत फाटक (४७ ) यांना शिवीगाळ करून मारहाण करून जखमी केले.
याप्रकरणी योगिता फाटक यांच्या फिर्यादीवरून संशयित शंकर फाटक यांच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगिता फाटक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवार दुपारी १२ वा. च्या सुमारास माझ्या कोंबड्या शेजारचे शंकर फाटक यांच्या कंपाऊंडमध्ये गेल्याचा त्यांना राग आला. त्यामुळे त्याने योगिता फाटक यांना शिवीगाळ करून हातातील लाकडी दांड्याने उजव्या खांद्याच्या पाठीमागे मारून दुखापत केली. तसेच शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधीक तपास कणकवली पोलिस करत आहेत.





