शरद पवारांच्या राजीनाम्याची फडणवीसांनी उडवली खिल्ली…!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य केलं आहे. आपल्या खास शैलीत त्यांनी शरद पवारांवर टोलेबाजी केली आहे. टीआरपी कसा घ्यायचा याचं प्रशिक्षण आपण शरद पवारांकडून घेतलं पाहिजे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी २ मे रोजी लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा देतो असं जाहीर केलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.

“टीआरपी कसा घ्यायचा याचं प्रशिक्षण आपल्याला घ्यावं लागेल. मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो. माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल. मग माझा पक्षच ठराव करेल. मग मीच राजीनामा मागे घेईन आणि माझ्या जागी परत येईन. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना आपल्या कृतीतून सांगितलं की राजीनामा देतो म्हणणं आणि राजीनामा देणं यातला फरक काय आहे?” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.