पत्रकार मंगल कामत यांच्या ‘माझा जीवनप्रवास’ आत्मचरित्राचं शानदार प्रकाशन

बांदा : महाराष्ट्र माझाच्या ज्येष्ठ पत्रकार मंगल कामत यांच्या “माझा जीवनप्रवास” या आत्मचरित्राचं आज बांदा इथं विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते शानदार प्रकाशन करण्यात आलं.

यावेळी व्यासपीठावर बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामराव काळे, ऍड. संदीप निंबाळकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, किरातच्या संपादिका सीमा मराठे, डॉ. रूपेश पाटकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, श्वेता कोरगावकर, खान सर, प्रमोद कामत आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पत्रकार मंगल कामत यांच्या पत्रकारितेतील संघर्षमय वाटचालीच कौतुक करत पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्याचे आयोजन बांदा पत्रकार मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आलं होतं. सुरवातीला पत्रकार आशुतोष भांगले यांनी ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नितीन नाईक तर प्रस्ताविक पत्रकार आशुतोष भांगले यांनी केलं.