कणकवली : परप्रांतिय युवकाने त्यांच्या प्रांतात जाऊन आणलेल्या अल्पवयीन युवतीने कनेडी बाजारपेठेत भाड्याच्या रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन दिवसापूर्वी रात्रीच्यावेळी घडलेल्या या घटनेबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. परंतु या घटनेमुळे ‘लव्ह जिहाद’ च्या पार्श्वभुमीवर वेगवेगळे तर्क-वितर्क लढविले जात आहे. सदरची युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद ‘त्या’ प्रांतातील पोलिसांत दाखल झाली आहे. बिहार राज्याचे पोलिस कणकवलीच्या दिशेने येण्यास मार्गस्थ झाले असून ते आल्यावर या घटनेबाबत अधिक माहिती मिळू शकेल.
‘त्या’ युवतीचा मृतदेह शासकीय रूग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आला आहे. युवतीच्या नातेवाईकांनी तसेच त्या पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे ‘त्या’ मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले नाही. ते पोलिस आल्यावर ‘त्या’ युवतीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.





