कुणकेश्वर समुद्रात युवक बुडाला मित्रांसमवेत समुद्रात पोहत असताना घडली दुर्घटना..!

245

 देवगड : कुणकेश्वर समुद्रात मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेलेला स्वराज सुनील पेडणेकर (२०) रा कुणकेश्वर चांदेलवाडी हा युवक बुडाला. त्याचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी ४:३० च्या सुमारास त्याचा सापडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वराज्य मित्रांसोबत गुरुवारी ३:३० वाजनेच्या सुमारास मारुती मंदिरा खाली कुणकेश्वर समुद्रात होण्यासाठी केला होता चौघेजण होत असताना स्वराज्य हा लाटां बरोबर पाण्यात ओढला गेला मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी आरडाओरड केली. मात्र घटनास्थळी ग्रामस्थ धावून येईपर्यंत तो पाण्यात बुडाला होता .घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कुणकेश्वर परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. सर्व ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतल्यानंतर तासाभरानंतर त्याचा मृतदेह तो पोहत असलेल्या ठिकाणी पाण्यात सापडला. स्वराज्य देवगड कॉलेजमध्ये तेरावीमध्ये शिकत आहे आई,वडील, आजोबा दोन बहिणी असा परिवार वडील आंबा बागायतदार आहेत स्वराज्य दुर्दैवी निधनानंतर कुणकेश्वर गावात हळहळ व्यक्त होत आहे .याबाबत देवगड पोलीस ठाण्यात खबर दिली असून देवगड पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे याबाबतचा अधिक तपास देवगड पोलीस करत आहेत