बावशी गावठणमध्ये जाणारा रस्ता ग्रामस्थांनी केला बंद ; आमदार नितेश राणे मार्ग काढणार का?

कणकवली :  कणकवली तालुक्यातील बावशी तेलीवाडी ते बावशी मुख्य रस्ता ग्रामपंचायतच्या 23 नंबरला लागलेला आहे.ग्रामपंचायतीने अद्याप खर्ची घातलेली नाही.15 वित्त आयोगाने निधी मंजूर करून सुद्धा खर्ची घातलेली नाही.या रस्त्यासंदर्भात वाद तीन वर्ष सुरू आहे.ग्रामपंचायतीकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नाही.
मात्र 251 सर्व्ह नंबर आणि 252 सर्व्ह नंबर मधील रस्ता होण्यासाठी ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे, परंतु 251सर्व्हे नंबर जमिनीचा वाद न्याय प्रविष्ट असल्याचे ग्रामपंचायतिकडून सांगण्यात येत आहे.त्यामुळे त्याठिकाणी त्या रस्त्याला निधी खर्ची घालता येत नाही असं ग्रामपंचायतीकडून वारंवार सांगितलं जातं आहे.मात्र 251 सर्व्हे नंबर वगळून 252 सर्व्हे नंबर पासून रस्त्याच काम सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांची आहे.
परंतु प्रशासनाला पत्र व्यवहार करून सुद्धा ग्रामस्थांच्या म्हणणं ग्रामपंचायत ऐकून घेत नसल्यामुळे सोमवारी महाराष्ट्र दिनी रोजी रस्ता बंद करून आंदोलन केले आहे.सर्व्ह नंबर 1032/1014 बावशी गावठणकडे जाणारा रस्ता ग्रामस्थांनी बंद केला आहे.तोपर्यंत 251 सर्व्ह नंबरचा मार्ग मोकळा होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनावर ठाम असणार आहोत ,अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या ह्या रस्ता प्रश्नी आमदार नितेश राणे यांनी तोडगा काढून हा प्रश्न मिटवावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे .