लोक अदालतीमध्ये १३१२ प्रकरणांपैकी एकूण १८१ प्रकरणी निकाली

देवगड : उच्च न्यायालय मुंबई, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधीसेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून दिवाणी न्यायालय क स्तर देवगड येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश तथा देवगड तालुका विधिसेवा समितीचे अध्यक्ष एस बी शेळके यांच्या हस्ते झाले. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिवाणी व फौजदारी खटले तसेच वादपूर्व प्रकरणे अशा १३१२ प्रकरणांपैकी एकूण १८१ प्रकरणी निकाली काढण्यात आली. यातून ९८ लाख ३३ हजार ५२ रुपये इतकी वसुली झाली .
तालुका विधी सेवा समिती देवगड व तालुका बार असोसिएशन देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवगड तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अँड देवानंद गोरे, ज्येष्ठविधीज्ञ अँड अविनाश माणगावकर, अँड प्रकाश बोडस, अँड लक्ष्मीकांत नाथगोसावी,अँड इंद्रनील ठाकूर, अँड कौस्तुभ मराठे,अँड प्रसाद करंदीकर अँड अभिषेक गोगटे, अँड आशिष लोके, अँड आरती खाडिलकर, अँड मैथिली खोबरेकर, अँड संगीता कालेकर, अँड जाधव, अँड सिद्धेश माणगावकर, अँड सांगळे यांच्यासह पंचायत समितीचे विस्तार अधिकारी निलेश जगताप दिवाणी न्यायालयाचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते या लोक अदालती मध्ये दिवाणी व फौजदारीकडील एकूण २६६ जावे ठेवण्यात आले होते यातील ५२ कटले निकालने काढण्यात आली यातून ८६ लाख ५८ हजार २८ रुपये झाली तर बँक दूरसंच विभाग ग्रामपंचायत विभाग नगरपंचायत महावितरण यातील १०४६ इतकी वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती यातील १२९ प्रकरणे निकाली काढण्यात आली यातून एकूण ११७५ हजार २४ इतकी वसुली झाली आहे पॅनलचे सदस्य म्हणून अँड प्रसाद करंदीकर यांनी काम पाहिले.