सावंतवाडी- मळेवाड येथील भव्य सांस्कृतिक पर्यटन महोत्सव 2023 च्या पहिल्या दिवसाचा अशोक दळवी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
मळेवाड जकातनाका येथे ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे यांच्या वतीने भव्य सांस्कृतिक महोत्सव 2023 चे 30 एप्रिल ते 4 मे 2023 असे पाच दिवशीय आयोजन करण्यात आलेले आहे.या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री गणेशावर अभिषेक,सत्यनारायण पूजा व रात्री हेळेकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग संपन्न झाला.महोत्सवाच्या पहिल्या दिवशीचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून तर शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी आपले मनोगत व्यक्त करत असताना नारायण उर्फ बबन राणे यांनी गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिलेगावामध्ये पाच दिवसाचा महोत्सव भरवून सांस्कृतिक चळवळ चालू ठेवल्या बद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.तर उद्घाटक अशोक दळवी यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना माजी पालकमंत्री तथा विद्यमान शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचे आश्वासन दिले.गावाच्या विकासासाठी मदत करण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध आहोत असेही आश्वासन ग्रामपंचायतला व युवा मित्र मंडळाला दिलेया मोर्चाच्या पहिल्या दिवसाच्या शुभारंभ माझ्या हस्ते करण्याचा मान दिल्याबद्दल दळवी यांनी आयोजकांचे आभार मानले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच हेमंत मराठे यांनी केले.या शुभारंभ प्रसंगी सरपंच सौ मिलन पार्सेकर, ग्रामपंचायत सदस्य कविता शेगडे,अमोल नाईक,मधुकर जाधव,सौ सानिका शेवडे,रिक्षा चालक-मालक संघटना अध्यक्ष गुरुप्रसाद नाईक,व्यापारी संघटना मळेवाड जकातनाका अध्यक्ष पांडुरंग गावडे,माजी पं स सदस्य बाळा शिरसाट उपस्थित होते.





