सावंतवाडी – ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेने मूकबधिर मुलीला ध्वजारोहणाचा मान देत एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेने 1 मे महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहणाचा मान मूकबधिर मुलगी सुचिता कारूडेकर हिला दिला.मूकबधिर मुलीच्या हस्ते ध्वजारोहण करून ग्रामपंचायत ने एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.यापूर्वी देखील विधवा महिला, माजी सैनिक,अपंग व्यक्ती,शहीद झालेल्या सैनिकांची पत्नी अशा व्यक्तींच्या हस्ते ग्रामपंचायत ने ध्वजारोहण करण्याचा मान दिला आहे.ध्वजारोहणाचा मान वेगवेगळ्या व्यक्तींना देऊन या ग्रामपंचायत कडून एक वेगळा आदर्श दाखवला जात आहे.या ध्वजारोहण प्रसंगी सरपंच सौ मिलन विनायक पार्सेकर,उपसरपंच हेमंत रमाकांत मराठे,पोलीस पाटील दिगंबर मसुरकर,आशासेविका सौ अनुष्का नाईक,सिद्देश मुरकर,सखाराम जाधव,नंदू पालयेकर आदी उपस्थित होते.





