मळेवाड इथं आज ‘शापमुक्त’ दशावतार नाट्यप्रयोग

सावंतवाडी : आज मळेवाड येथे शापमुक्त हा दशावतारी नाट्य प्रयोग संपन्न होणार आहे.
ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे यांच्या वतीने 30 एप्रिल ते 4 मे या कालावधीत भव्य सांस्कृतिक पर्यटन महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आलेले आहे.आज दुसऱ्या दिवशी सकाळी संत समाज मुळे वाढ व तालुका पत्रकार संघ सावंतवाडी यांच्या सहकार्याने मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात महारक्तदान शिबिर संपन्न होणार आहे. तर रात्री आठ वाजता सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ,दोडामार्ग यांचा शापमुक्त हा नाट्यप्रयोग मळेवाड जकातनाका येथील श्री गणपती मंदिर रंगमंचावर संपन्न होणार आहे.तरी सर्व रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.