संजय राऊत – सत्यपाल मलिक पाकिस्तानी एजंट : नितेश राणे

Maharashtra, March 15 (ANI): BJP Leader Nitesh Narayan Rane addresses a press conference at Party Office in Mumbai on Monday. (ANI Photo)

कणकवली : वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले संजय राऊत आणि सत्यपाल मलिक यांची भेट नुकतीच दिल्ली येथे झाली. संजय राऊत आणि मलिक यांच्या भेटीवरून नितेश राणे यांनी जहरी टीका केली आहे. पाकिस्तानचे दोन एजंट दिल्लीमध्ये भेटले. भारताविरुद्ध अतिरेक्या कारवाया झाल्या. त्याला या भेटीच संदर्भ देण्यात यावं. केंद्र सरकारने या दोघांच्या भेटीवर बारकाईने लक्ष घालावं. संजय राऊत आणि मलिक तसेच पाकिस्तानची भाषा एकच आहे. या दोघांच भेटी मागे काय उद्दिष्ट होत. या भेटीत देश विरुध्द षडयंत्र रचलं होत का? आणि देशाच्या विरुद्ध कारवाया शिजत होत्या का? या बाबत संजय राऊत आणि मलिक यांनी नार्को टेस्ट करावी. अशी मागणी मी करत आहे. पाकिस्तान सरकारनी मलिकच्या वक्तव्य नंतर भारताच्या प्रतिमे बद्धल केलेली टीका आणि या दोघांची भेट म्हणून मी संजय राऊतला सांगेन त्याला मुबंई आणि महाराष्ट्रामध्ये पार्सल आणण्यापेक्षा मलिक सकट संजय राऊतांनी पाकिस्तानमध्ये निघून जावं, तिथे बसून शीरकुरमा खावं, बिर्याणी खावी, अशा देशद्रोही लोकांची भारताला काहीही गरज नाही. मुबंई आणि महाराष्ट्रामध्ये मलिक सारख्या देशद्रोहीला आम्ही पाऊलही ठेऊ देणार नाही .

भगतसिंग कोषारीने कुठेही भारता विरुद्ध राज्य विरुद्ध कुठलंही वक्तव्य केलेलं नाही.भारताची प्रतिमा आणि सुरक्षितता कुठेही अडचणीत येईल . पंतप्रधान यांच्याबद्धल जगामध्ये वेगळा मान आहे. पंतप्रधान बद्धल कुठेही षडयंत्र रचलेल नव्हतं. या नालायक संजय राऊतांनी कोणाची तुलना कोणा बरोबर करताय. याबद्दल विचार करून बोलावं. अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे