सुरज पंचोलीची अभिनेत्री जिया खान प्रकरणातून निर्दोष मुक्तता…!

मुंबई : अभिनेत्री जिया खान ( 26 ) आपल्या जुहू येथील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळल्याच्या दहा वर्षानंतर मुंबईच्या विशेष सीबीआय कोर्टाने तिचा तत्कालीन मित्र अभिनेता सुरज पंचोली याला निर्दोष मुक्त केले . विशेष न्यायाधीशांनी या प्रकरणांमध्ये पुराव्यांचा अभाव यावर हा निकाल दिला आहे . सुरज पंचोली हे अभिनेत्री जरीना वहाब आणि आदित्य पंचोली यांचे पुत्र आहेत . जिया खान आपल्या घरामध्ये लटकलेल्या अवस्थेत मृत आढळून आल्याच्या सात दिवसानंतर 10 जून 2013 ला सुरजला अटक करण्यात आली होती.

जियाची आई राबिया खान हिने सुरजच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती . यामध्ये एक महिन्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीनावर सोडले होते . राबिया खान यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूचे कटकारस्थान असल्याची तक्रार याचिका कोर्टात सादर केली होती . यावर उच्च न्यायालयाने 2014 मध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपवला होता . सीबीआई ने 2015 मध्ये आपल्या आरोपपत्रात सुरज पंचोली याच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप दाखल केला होता, मात्र हत्येच्या आरोपातून त्याची मुक्तता केली होती .