पुणे : अहमदनगरच नाव अहिल्यानगर करा अशी मागणी केली जात असतानाच आता पुण्याचे नाव बादलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करावे, अशी मागणी केली आहे. तर या नावास हिंदू महासंघाने विरोध केला आहे. त्यामुळे पुणे शहर नामांतराच्या मुद्द्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.




