प्रमाणपत्रांअभावी एकाचवेळी दोन पदवी प्रवेशांत अडचणी…!

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम करण्यास मुभा दिली आहे. मात्र उच्च शिक्षण संस्थाकडून विद्यार्थ्यांना स्थलांतर प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखल्यासाठी आग्रह धरण्यात येत असून, या प्रमाणपत्रांअभावी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास अडचणी येत असल्याचे यूजीसीच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम करता येण्यासाठीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश यूजीसीने विद्यापीठांना दिले.