त्या जहाजबाबत सोशल मीडियावर अफवा पसरल्याबद्दल अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल.!

83

देवगड : विजयदुर्ग मध्ये हाजी अली या नौकेवर पाकिस्तानचे नागरिक असून शेळ्यांची वाहतूक इराणमध्ये करीत असल्याचा खोटा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करून अफवा पसरल्याबद्दल विजयदुर्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.हा प्रकार 20 एप्रिल रोजी घडला .
याबाबत विजयदुर्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 एप्रिल रोजी विजयदुर्ग किल्ल्यासमोरील समुद्रात हाजी अली हे जहाज आले होते या जहाजावर पाकिस्तानी नागरिक आहेत ते उडवाउडुची उत्तर देत असून या जहाजामधून शेळ्यांची वाहतूक इराण मध्ये होत आहे असा खोटा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला हा मेसेज विजयदुर्ग मधील नागरिक व पोलीस पाटील यांच्या पर्यंत पोहोचला अशा प्रकारे खोटा मेसेज सोशल मीडिया व्हायरल केल्याप्रमाणे विजयदुर्ग पोलीस तालुकाचे पोलीस कॉ. श्रीनाथ जयसिंग जाधव यांनी दिलेले तक्रारीनुसार पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमन 37 (1) कलम 135 अनव्ये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबतचा अधिक तपास विजयदुर्ग पोलिस स्टेशनचे एपीआय भारत फारणे करत आहेत.