कणकवली : कनेडी बाजारपेठेपासून जवळच असलेल्या सांगवे पुलानजीक चढावावर समोरून येणाऱ्या परीक्षेला इको गाडीची धडक बसून झालेल्या अपघातात रिक्षा चालक सचिन म्हसकर (वय ३५, रा. पिंपळवाडी, फोंडाघाट) याच्यासह दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाला आहे. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून तातडीने गोवा मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
संजना संदीप म्हसकर (वय २५, रा. पिंपळवाडी), सुलोचना अनंत सापळे (रा. हरकुळ) या गंभीर जखमींवर येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना गोवा बांबुळी येथील रूग्णालयात हलविण्यात आले. तर रिक्षाचालक सचिन म्हसकर याच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कनेडी बाजार पेठ येथून कणकवलीच्या दिशेने रिक्षाचालक आपल्या ताब्यातील रिक्षा (एम एच ०७ ४२८९ ) कणकवली येथे जात होते. रिक्षेत दोन महिला व व अन्य एक प्रवासी होता. कनेडी बाजारपेठेपासून काही अंतरावर सांगवे उतारावर आले असता समोरून येणाऱ्या इको मोटारीची समोरासमोर धडक बसली. ही धडक इतकी जबरदस्त होती की रिक्षाच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला.
ठाणे येथून नरडवेकडे जाणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांच्या इको चालकाने ही धडक दिली. घटनास्थळी कनेडी परिसरातील अनेक तरुण गोळा झाले होते. जखमी ना तातडीने रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.





