खरच कोण लक्ष देणार…? | रस्त्यांचा दर्जा खालावलेला….मात्र, ठेकेदारांचा आर्थिक स्थर उंचावलेला

279

सावंतवाडी : ग्रामीण भागातील रस्ते हे नागरिकांना बाजार, शहरांना जोडण्याचे महत्वाचे माध्यम असून याकरिता रस्ते बांधकामांकरीता अनेक योजनांच्या माध्यमातून आवश्यक त्या निधीची पूर्तताही केली जाते. ग्रामीण स्त्यांसाठी शासनाकडून सध्या मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध करून दिला जातोय..मात्र, निधीच्या तुलनेत सध्या सावंतवाडीत रस्त्यांची कामे मात्र त्या दर्जाची होताना दिसत नाहीत. सध्या सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावात रस्त्यांची कामे सुरु आहेत. बऱ्याच ठिकाणची कामे निकृष्ट दर्जाची  असल्याची ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. अनके गावात ग्रामस्थांनी कामे सुद्धा रोखलीहि होती.

रस्त्याच्या कामे सुरु असताना दर्जाचा अजिबात विचार केला जात नाही.  रस्त्याच्या चांगल्या दर्जासाठी जे निकष आहेत, अशा निकषांना फाट्यावर मारून केवळ थुकपट्टी लावण्याचे प्रकार ठेकेदाराकडून सुरु असतात. काम सुरु असताना सरकारी अधिकारी तर सोडा साधा ठेकेदार किंवा त्याचा सुपरवायझर सुद्धा अनेकदा कामाच्या ठिकाणी नसतो. जास्त नफा कमवण्याच्या नादात ठेकेदाराकडून कामाच्या दर्जाची वाट लावली जाते. रस्त्यांसाठी किंवा कोणत्याही शासकीय कामासाठी जो निधी मिळतो, तो वरवर आपल्याला शासकीय निध वाटत असला तरी तो सर्वसामान्यांनी भरलेल्या करांच्या माध्यमातूनच असतो. त्यामुळे हा पैसा जनतेचा असतो. आणि याच पैशावर ठेकेदार मामामाल होतात. अगदी काही कामांत ठेकेदार गाड्या, बंगले घेताना आपल्याला दिसून येतात. प्रत्येकाला कामाचा मोबदला, नफा मिळायलाच हवा.. मात्र, ओरबाडून खायची जी प्रवूत्ती वाढत चालली ती थांबायला हवी.  खर पाहिलं तर हि सामान्य माणसाची लुट आहे..हा जनतेच्या घामाचा पैसा आहे. आणि हा पैसा फुकटचा अनेकांच्या घशात जातो. या सर्व ठेकेदारांना कोणाचा वरदहस्त आहे हे काही  वेगळ सांगायला नको.

काम निकृष्ट केलं म्हणून ठेकेदारावर कारवाई केली, त्याच्या कामाची चौकशी केली अशी घटना दुर्मिळच पाहायला मिळते. प्रशासन, राजकीय व्यक्तीकडून अशी अपेक्षा करण्यात काही अर्थच नसल्याच दिसून येत. त्यामुळे आता नागरिकांनी सतर्क राहणे, ठेकेदार करत असलेल्या कामांवर लक्ष ठेवण,  एखाद्या ठेकेदाराने नियमानुसार काम केलं नसल्यास, किंवा काम लवकर खराब झाल्यास त्याची तक्रार करणे, त्या तक्रारीचा पाठपुरावा करणे या गोष्ठी गावातील ग्रामस्थांना कराव्या लागतील.. कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करावा लागेल. निकृष्ठ  काम त्याच ठेकेदाराकडून पुन्हा करून घेण्यास भाग पाडलं पाहिजे. अन्यथा गावातील रस्ते, इतर केलेली कामे यांचा दर्जा घसरलेलाच दिसेल मात्र, ठेकेदाराचा आर्थिक स्थर मात्र उंचावलेला दिसेल.