कणकवली प्रांताधिकारी पदाचा जगदिश कातकर यांनी पदभार स्वीकारला…!

कणकवली : प्रांताधिकारी पदाचा जगदिश कातकर यांनी पदभार स्वीकारला. कणकवली तहसिलदार आर. जे. पवार, शिरस्तेदार एस. व्ही. राठोड यांनी त्यांचे स्वागत केले. जगदिश कातकर यांनी यापुर्वी कणकवलीचे निवासी नायब तहसीलदार, तहसीलदार २०९ पर्यंत सुमारे पाच वर्षे काम केले होते. लोकाभिमुख प्रशासन चालविणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.

कणकवलीला नायब तहसिलदार म्हणून काम केल्यानंतर त्यांनी देवगड येथे तहसिलदार, कणकवली येथे तहसिलदार म्हणून काम केले होते. त्यानंतर रत्नागिरी, चिपळूण व वेंगुर्ले येथेही त्यांनी तहसिलदार म्हणून काम केल्यानंतर कोकण भवन येथे पुरवठा अधिकारी म्हणून काम केले होते. त्यानंतर नागपूर येथे उपजिल्हाधिकारी राजशिष्ठाचार या पदावर कार्यरत होते. प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव असलेले जगदीश कातकर हे अत्यंत प्रामाणीक अधिकारी म्हणून परिचित असून त्यांनी एलएलबीपर्यंतचे शिक्षणही पुर्ण केले आहे. दरम्यान, प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी सोमवारी सातारा येथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून पदभार स्विकारला आहे.