अकोला : अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे बाळापुर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज मंदिरातील पत्र्याच्या शेड वर पाऊस व वाऱ्यामुळे कडुलिंबाचे झाड कोसळल्यामुळे मंदिरात उपस्थित असलेली ३० ते ३५ व्यक्ती टीन शेड खाली दबल्यामुळे गंभीर जखमी झालेत . या घटनेमध्ये सात लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

या संदर्भात जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले . रात्री उशिरापर्यंत मदत कार्य पारस येथे सुरू होते यावेळी विभागीय आयुक्त यांनीही अकोला येथे भेट देऊन जखमींची विचारपूस केली . रविवार असल्यामुळे मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. त्यातच मंदिराच्या लगत असलेले मोठे झाड पत्र्याच्या शेड वर पडल्यामुळे टीन शेड खाली असलेले भाविक दबल्यामुळे सात लोकांचा मृत्यू झाला.

रात्री उशिरा अमरावती विभागीय आयुक्त डॉ निधी पांडेय यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात भेट देउन जखमिंची विचारपूस केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची माहिती घेतली आहे दोघांनाही शोक व्यक्त केला आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत देखील त्यांनी जाहीर केली आहे. तसेच शासकीय खर्चाने सर्व जखमींवर व्यवस्थित उपचार करण्यात यावेत असे निर्देश त्यांनी दिले आहेत.





