सावंतवाडी : जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था झाडपोली, पालघर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवार दिनांक १७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजता स्नेहप्रिया, २०२, श्री गणेश रेसिडेन्सी, माठेवाडा सावंतवाडी येथे जिजाऊ स्पर्धा परीक्षा वाचनालयाचा पाचवा वर्धापन दिन संपन्न होणार असून, या सोहळ्यासाठी अर्चना फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे- परब व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा.रूपेश पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन जिजाऊ मोफत स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे सल्लागार व समन्वयक अँड.नकुल पार्सेकर व व्यवस्थापक विश्वनाथ सनाम यांनी केले आहे.





