आमदार नितेश राणे यांच्या कामाचे केंद्रीय मंत्री राणे यांनी केले कौतुक…

86

कणकवली : दरम्यान आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेऊन इनक्युबेशन सेंटर सुरू केले. त्याचप्रमाणे मुलींसाठी मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला याबद्दल विचारले असता,केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे म्हणाले आमदार नितेश राणे यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील काम खूपच चांगले आहे. त्या कामाची नोंद जनता सुद्धा वेळोवेळी घेते. आणि त्यांना प्रतिसाद देते. त्यांचे अभिनंदन करते. असे चांगल्याची नोंद घेणारी जनता असेल तेव्हा आणखीन चांगले काम करणारे निपजतील. चांगल्या कामाचे कौतुक झाले तर रावण निपजणार नाहीत मात्र समाजसेवक नक्कीच घडत जातील असा विश्वास यावेळी केंद्रीय मंत्री राणे यांनी व्येक्त केला

राणेंचे कंपाउंड ओलांडता येणार नाही

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पर्यंत धरण रस्ते पाणी विविध विकास कामे मीच आणली विरोधकांनी फक्त ठेके घेतले आणि निकृष्ट कामे केली अशी टीका करताना आमदार वैभव नाही घे सिंधुदुर्गात आले की उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत असल्याचे भासवतात मात्र मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच केबिनमध्ये बसलेले असतात त्यांना शिवसेनेत जायचे आहे त्यासाठी ते एकनाथ शिंदे यांना विनंती करतात मात्र त्यांच्यामध्ये आणि आमच्या मध्ये राणेंचे कंपाउंड आहे .राणेंचे कंपाउंड ओलांडता येणार नाही. असेही त्यांनी सांगितले.