कणकवली : उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रात रावणाचे राज्य होते ते गेले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रामराज्य निर्माण करत आहेत. त्यामुळे ते अयोध्येला जाऊन श्री रामाचे दर्शन घेत असतील तर टीका कशाला. विरोधकांना चांगल्या गोष्टी दिसतच नाहीत का ? असा सवाल करत डोळे असून चालत नाही तर डोळसपणा असावा लागतो, तो आमच्या विरोधकांमध्ये नाही आणि म्हणूनच ते देवदर्शनालाही टीकेचे रूप देतात अशी प्रतिक्रिया केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
यापूर्वी जे लोक अयोध्येला गेले होते ते का गेले होते ? काय करायला गेले होते आणि तेथे काय केले ? हे मला माहिती आहे मात्र अशावेळी व्यक्तिगत टीका योग्य नाही म्हणून मी बोलत नाही. मात्र ती वेळ आणू नका असा इशाराही यावेळी श्री राणे यांनी महाविकास आघाडीला दिला.
Home ब्रेकिंग न्यूज आमच्या विरोधकांना डोळसपणा नाही म्हणून ते देवदर्शनावरही टीका करतात ; केंद्रीय उद्योग...





