कार पलटली | सावंतवाडीत असा झाला अपघात…

67

सावंतवाडी : शिक्षक विजय गावडे यांच्या कारची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. तर कार रस्त्यात पलटी झाली आहे . हा अपघात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सबनीसवाडा येथील शाळा नंबरच्या ४ च्या समोर असलेल्या उताराला घडला. यात वेंगुर्ला येथील परप्रांतीय कामगार जखमी झाला आहे. त्याला अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने शिक्षक गावडे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.