नगरपंचायत कर्मचाऱ्यांची वाट न बघता स्टॉलधारकांनी केली साफसफाई…!

61

कणकवली : शहरातील उड्डाणपुलाखालील अनधिकृत स्टॉल हटविल्या नंतर देखील स्टॉल धारकांचा प्रामाणिकपणा पाहायला मिळाला. आपण ज्या जाग्यावर अनेक वर्षे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. त्या जागेची साफसफाई करत या स्टॉल धारकांनी आगळावेगळा आदर्श समाजासमोर घालून दिलाय. स्टॉल हटविल्यानंतर त्याठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्यांची वाट न बघता या जागेची साफसफाई या स्टॉल धारकांनी केलेली पाहायला मिळाली.