स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ६ लाख ८५ हजार च्या गुटख्यासह आरोपी केला जेरबंद – एलसीबी पोलीस निरीक्षक संदीप भोसले

57

सिंधुदुर्गनगरी : एलसीबी च्या पथकाने तब्बल ६ लाख ८५ हजार २९० रुपयांच्या गुटख्यासह टाटा कार मिळून १२ लाख ८५ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यातील सावंतवाडी खासकीलवाडा येथे राहणारा आरोपी बाबाजी विजय नाईक (वय ४०) याला एलसीबी जे ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल,अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती एलसीबी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी दिली.

सहाययक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीच्या पथकाने मुंबई गोवा हायवेवर साळगाव येथे ब्रिजवर आज सायंकाळी ६ वाजता ही कारवाई केली. या कारवाईत पोलीस हवालदार अनिल धुरी, प्रवीण वालावलकर, यशवंत आरमारकर, चंद्रहास नार्वेकर, प्रथमेश गावडे, गुरुनाथ कोयंडे, अमित पालकर सहभागी झाले होते. आरोपी बाबाजी नाईकवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कुडाळ पोलीस करत आहेत.