मालवण : भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेत प्रत्येक नागरिकाला न्याय मिळेल, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात आपल्या देशात अल्पसंख्य आयोग, सच्चर आयोग, अल्पसंख्यांक विकास मंत्रालय आहेत ; मात्र बहुसंख्य हिंदूंना कोणतेही संरक्षण देणारे मंत्रालय अथवा आयोग नाही. देशभरात केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण केले जाते, मग मशिदी – चर्च यांचे सरकारीकरण का नाही ? अल्पसंख्याकांना धर्माच्या आधारावर शैक्षणिक अनुदान, मग बहुसंख्य हिंदूंनी काय अपराध केला आहे ? हे सर्व पहाता भारतात खरोखरच धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) व्यवस्था अस्तित्वात आहे का ? हिंदूंच्या हजारो युवतींना उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद म्हणजे लव्ह जिहाद ! भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे संकट म्हणजे हलाल जिहाद ! यांसारख्या हिंदूंवर होणाऱ्या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदूंच्या प्रभावी संघटनासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ मार्च २०२३ या दिवशी सायंकाळी ५ वाजता मालवण तालुक्यातील वायंगणी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाच्या पटांगणात हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक हेमंत मणेरिकर यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी त्यांच्या सोबत आचरा व्यापारी संघाचे उपाध्यक्ष मंदार सांबारी, सनातन संस्थेचे राजन सकपाळ आणि हिंदू जनजागृती समितीचे दिनानाथ गावडे उपस्थित होते.
यावेळी ते पुढे म्हणाले कि, हिंदु जनजागृती समिती गेली २० वर्षे हिंदु राष्ट्र-जागृतीचे कार्य करत आहे. आज भारतातील २८ राज्ये आणि जगभरातील अनेक देशांमध्ये समितीचे कार्य सुरु आहे. अशा प्रभावीपणे कार्यरत असणाऱ्या हिंदु जनजागृती समितीची ही सभा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहे, ही धर्मप्रेमी हिंदूंसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या सभेला सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक श्री. नीलेश सांगोलकर हे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
या सभेचा मालवण, कणकवली, देवगड या तालुक्यातून प्रसार चालू आहे. गेले महिनाभर विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ, लोकप्रतिनिधी यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. कोपरा बैठका (कॉर्नर मिटिंग), भित्तीपत्रके, हस्तपत्रके, फलकलेखन, होर्डिंग, सामाजिक माध्यमे यांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर सभेचा प्रसार चालू आहे. अनेक युवक धर्मरक्षणाच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित करत आहेत.
या सभेच्या प्रचारासाठी २७ फेब्रुवारी २०२३ या दिवशी सकाळी १०.३० वाजता आचरा येथे भव्य वाहनफेरी काढण्यात येणार आहे. या वाहनफेरीचा प्रारंभ श्री देव रामेश्वर मंदिर येथे होणार असून आचरा तिठा, बाजारपेठ, हिर्लेवाडी, वायंगणी, श्री स्वामी समर्थ मठ, आचरा हायस्कूल मार्गे आचरा तिठा आल्यावर सांगता होणार आहे.
या फेरीसह ४ मार्च २०२३ या दिवशी होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कण्यात आले आहे.





