कुणकेश्वर यात्रोत्सवातून देवगड आगाराला ७ लाख २९ हजार ६६७ रू. चे उत्पन्न…!

देवगड : दक्षिण कोकणची काशी श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेतून देवगड आगाराला ७ लाख २९ हजार ६६७ रुपयाचे उत्पन्न प्राप्त झाले असल्याची माहिती देवगड आगारातून देण्यात आली. देवगड तालुक्यातील ग्रामीण भागातून २८ गाड्यांद्वारे विशेष प्रवासी सेवा देत १६.२१४ किलोमीटर अंतर ४७१ प्रवासी फेऱ्यातून २२,५५५ प्रवाशांची सेवा देत यात्रा कालावधीत एकूण ७ लाख २९ हजार ६६७ रुपये एवढे उत्पन्न सवलत मूल्यासह प्राप्त केले आहे.

ग्रामीण यात्रा फेरीबरोबर देवगड आगारातून बोरवली, पुणे, बेळगाव, देवगड याबरोबर कणकवली नांदगाव रेल्वे स्टेशन या मार्गावर देखील यात्रा काळात जादा प्रवासी फेऱ्यांमधून एवढे उत्पन्न प्राप्त केले आहे. २०२० सालच्या यात्रा काळातील उत्पन्न हे ६ लाख १४ हजार ०१५ रुपये होते. २०२० च्या यात्रा कालावधीतील उत्पंन्नापेक्षा २०२३ सालचे उत्पन्न जास्त असल्याचेही देवगड एसटी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.