फोन काॅलद्वारे तब्बल २१ लाखांची फसवणूक | तक्रार दाखल | सावंतवाडीतील प्रकार

सावंतवाडी : बंद पडलेली एक विमा पाॅलीसी सुरु करण्याच्या बहाण्याने केलेला फोन तळवडे येथील चंद्रशेखर मल्हार यांना चांगलाच महाग पडला. त्या पाॅलीसीवर कर्ज मंजूर करतो असे सांगून, एका व्यक्तीने वारंवर पैशांची मागणी केली. त्यानुसार मल्हार यांनीही सांगेल ती रक्कम त्यांच्याकडे जमा जमा केली. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मल्हार यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फसवणूक झालेली रक्कम थोडीथोडकी नसून तब्बल २१ लाखांच्यावर आहे.