सावंतवाडी : आंबेगाव, म्हारकाटेवाडी जंगल क्षेत्रात वनराई बंधारा बांधण्यात आला. आंबेगाव, म्हारकटेवडी परिसरात शासकीय जंगल मोठ्या प्रमाणात आहे व सध्या वन्य प्राण्यांना पुरेसे पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे गावामध्ये वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.
त्यामुळे वन्य प्राण्यांना जंगल क्षेत्रात पाणी उपलब्ध झाल्यास प्राण्यांचा वावर गावामध्ये काहीसा कमी होईल या उद्देशाने मा. वनक्षेत्रपाल सावंतवाडी मदन क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनखाली दत्तात्रय शिंदे वनरक्षक आंबेगाव यांनी आंबेगाव गावचे सरपंच शिवाजी परब, उपसरपंच गावडे, ग्रामसेवक राऊळ, ग्रामपंचायत सदस्य योगेश गवळी, मुळीक, राऊळ, ग्राम पंचायत शिपाई दाजी तेली, राकेश कुंभार, रुपेश जाधव ग्रामस्थ यांच्या मदतीने वनराई बंधारा बांधणेत आला.





