सावंतवाडी : शिरोडा येथे कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांची सोय व्हावी यासाठी एसटीने साटेली ते शिरोडा बसफेरी सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थ व पालकातून कधी जात आहे.
पहाटेच्या काळोख्या रात्रीत मुलींना विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत २ कीलोमीटर पायपिट कींवा दुचाकीचा खर्च करुन कींवा सोबत पालकांना साटेली सातार्डा वरुन आरोस तिठा येथे एसटीसाठी मुलांना सोडावे लागते.यावर परीवहन मंडळाच्या (एसटीच्या) चुकीच्या धोरणाचा आणि एसटी कर्मचारी यांचा विचार करुन तोडगा काढावा आणि प्रशासनाचा कॅालेजच्या मुलांना एस टी चा प्रश्न सोडवावा अशी मागणी भाजप जिल्हा युवा मोर्चा जिल्हा सचिव संजय नाईक यांनी केली आहे.
वेंगुर्ला आगराची शिरोडा सातार्डा वस्तीची एसटी कोरोना काळापासुन ती आज पर्यंत सातार्डा येथे येत नाही.सदरची एसटी ही मळेवाडला वस्तीला राहून सकाळी आरोस तीठ्यापर्यंत येऊन पुन्हा ती शिरोडाकडे रवाना होते.कधी कधी सोमवारी एसटी येत नसल्याने सकाळचे इंग्रजी अकाऊंड सारखे दोनदोन लेक्चर चुकतात.आज अनेक शिक्षण पुरस्कार,मुला मुलींना दिले जातात.एकीकडे मुलं शिकली पाहिजे यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना,अनेक उपक्रम,योजना राबवल्या जातात. दुसरीकडे मुलांना शिक्षणासाठी अशी तारेवरची कसरत करावी लागते.ही शोकांतिका आहे. तरी साटेली येथील मुलांना शिरोडा येथे कॉलेजमध्ये जाण्यासाठी एसटी बस फेरी सुरू करावी अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा संजय नाईक यांनी दिला आहे.





